79557839

Date: 2025-04-06 06:02:17
Score: 3.5
Natty:
Report link

प्रति,

महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन

डॉ. मा. ना. मार्ग, मुंबई – ४०० ००८

विषय: वडील सतत आजारी असल्यामुळे अंतरविभागीय बदली करण्याबाबत विनंती

महोदय,

मी, उत्तम प्रल्हाद कोकाटे (वहाक – १४००१९), सध्या बीड विभागामधील माजलगाव आगार येथे २०१४ पासून कार्यरत आहे. माझ्या कार्यकाळात मी माझी सेवा समाधानकारकपणे बजावली आहे.

सदरहू विनंती करण्याचे कारण असे की, माझे वडील यांना कर्करोग व इतर गंभीर आजार असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची नियमित देखभाल आवश्यक आहे, जी मीच करू शकतो.

त्यामुळे, माझी अंतरविभागीय बदली बीड विभागातून अकोला विभागातील रिसोड आगार येथे करण्यात यावी, अशी मी नम्र विनंती करतो. वडिलांच्या आजारासंबंधी वैद्यकीय कागदपत्रे संलग्न केलेली आहेत.

आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.

आपला विश्वासू,

उत्तम प्रल्हाद कोकाटे

वहाक (१४००१९)

रा.

प. म. माजलगाव आगार

Reasons:
  • Long answer (-0.5):
  • No code block (0.5):
  • No latin characters (2.5):
  • Low reputation (1):
Posted by: Omkar Kokate